Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राजमाता अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन


सोलापूर :  पुण्यश्लोक, राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष पवार व महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून मंगळवारी, १३ ऑगस्ट रोजी अभिवादन करण्यात आले. यावेळी 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर अमर रहे, अमर रहे ,यळकोट यळकोट जय मल्हार' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी व महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर यांनी त्यांच्या मनोगतात अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्य-कर्तृत्वाला उजाळा देत विशेष कौतुक करत स्मृतिदिनी अभिवादन केले.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार,जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर, अल्पसंख्याक अध्यक्ष अमीर शेख, मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेहराज आबादीराजे, युवक समनव्यक महेश कुलकर्णी, सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे, ओबीसी विभाग सेल अध्यक्ष अनिल छत्रबंद, वाहतूक सेल अध्यक्ष इरफान शेख, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, प्रज्ञासागर गायकवाड, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, श्यामराव गांगर्डे, शरद येच्चे, प्रियंका जगझाप यांची उपस्थिती होती.