Type Here to Get Search Results !

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं आयोजित नेत्र चिकित्सा शिबीराचा ५५० नागरिकांना लाभ


सोलापूर : भारतीय स्वातंत्र्याच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्तानं ताज सोशल ग्रुप व लोकशाही फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोफत मोतीबिंदू ऑपरेशन शिबीराचे आयोजन करण्यात आलं होतं. या नेत्रचिकित्सा शिबिराचा ५५० नागरिकांना चिकित्सेचा लाभ झाला.  

सकाळी नऊ ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत ५५० लोकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. यामध्ये ४० रुग्ण आॅपरेशनचे रूग्ण मिळून आले, व ५८ गरजू लोकांना लोकशाही फौंडेशनकडून मोफत चष्म्याची फ्रेम देण्यात आले. यावेळी राज सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष यांच्या हस्ते लोकशाही फाउंडेशनचे संस्थापक तथा नेत्रचिकित्सा तज्ञ वसीम राजा बागवान यांना शाल व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

 माजी नगरसेवक तौफीक शेख यांच्या नई जिंदगी येथील कार्यालयात नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. नेत्र चिकित्सा तज्ञ व लोकशाही फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वसीमराजा बागवान यांच्याकडून ५८ गरजू नागरिकांना चष्म्याच्या फ्रेम मोफत देण्यात आल्या.

 यावेळी ताज सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व माजी नगरसेवक तौफिक शेख पैलवान, जी महापौर आरिफ शेख, माजी नगरसेविका वाहेदाबी शेख, वसीमराजा बागवान, अॅड मुबीन बागवान, नुरुद्दीन मुल्ला, आसिफ राजे, तौसिफ सगरी, अस्लम शेख, खाजा जवाब, पिंटू इनामदार, वसिम वस्ताद, पठाण चाचा, कलवल चाचा यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.