Type Here to Get Search Results !

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खा. तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 'अजित पर्व' निबंध लेखन स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


राष्ट्रवादी सोशल मिडीयाचा उपक्रम 

सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त व जनविश्वास सप्ताह अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीने उच्च माध्यमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांकरिता अजित पर्व या विषयावर निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेला उच्च माध्यमिक व माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी आपल्या कला कौशल्यातून लिहिलेले निबंध गुरुवारी जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी स्वीकारले. 

सुरुवातीस लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे  व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर व्यासपीठावरील प्रमुख अतिथी व इतर फ्रंटल सेल चे अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांचा सत्कार पार पडला. 



प्रस्ताविकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचे शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत सुरुवातीस उपमुख्यमंत्री पवार व खा. तटकरे यांना  वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अजित दादांनी राज्यात केलेला विकास, सर्व समाज घटकाला विविध शासकीय योजनेच्या माध्यमातून मिळवून दिलेला न्याय आणि योजनांचा  लाभ या दादांची कार्यावर कार्य कर्तृत्वावर आधारित अजित पर्व निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आल्याचे सांगितलं. 

या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम मला करता आलं, यासाठी उमाबाई श्राविका विद्यालयाचे प्राचार्य सुकुमार मोहोळ व शिक्षक गणेश लेंगरे, जैन गुरुकुल विद्यालयाचे प्राचार्य राजकुमार काळे, शैलेश पांगळ यांनी महत्त्वाची साथ दिली, त्यांचे विशेष आभार अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश लेंगरे तर शिक्षिका अर्चना कानडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर, महिला आघाडी प्रदेश सचिव लता ढेरे, युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का, युवती अध्यक्ष किरण माशाळकर, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, ज्येष्ठ नगरसेवक नारायण माशाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर उत्तर उपाध्यक्ष मनोज शेरला, प्रकाश झाडबुके, डॉक्टर सेल विभागाचे अध्यक्ष डॉ. संदीप माने, वाहतूक विभागाचे अध्यक्ष इरफान शेख, संस्कृतिक व चित्रपट विभागाचे अध्यक्ष आशुतोष नाटकर, कांचन पवार, प्राजक्ता बागल, मार्तंड शिंगारे, शामराव गांगर्डे, उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुकुमार मोहोळ, प्रा. प्रतिभा कंगळे, प्रा. अविनाश मुळकुटकर, प्रा. अर्चना कानडे, प्रा. सोमनाथ राऊत, प्रा. कल्याणप्पा हायगोंडे, शिक्षक गणेश लेंगरे, जैन  गुरुकुल प्राचार्य राजकुमार काळे, माध्यमिक विभाग प्राचार्य शैलेश पांगळ, शिक्षक शेळे यांची उपस्थिती होती.