सोलापूर : दैनिक तरुण भारतच्या मुख्य संपादकपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल प्रशांत माने यांचा महानगरपालिका पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन मुख्य संपादक प्रशांत माने यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पत्रकार अजित उंब्रजकर, प्रभू वारशेट्टी, नंदकुमार येच्चे, अजितकुमार संगवे आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते.