मार्कंडेय मंदिराच्या स्थापनेस 100 वर्षे पूर्ण; शताब्दी वर्षानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन

shivrajya patra


सोलापूर: पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेय मंदिराच्या स्थापनेस 100 वर्षे पूर्ण होत असून मंदिराच्या शताब्दी महोत्सव निमित्त शुक्रवारी, 9 ते 12 ऑगस्ट या कालावधीत मंदिरात श्री मार्कंडेय महामुनीचे पुर्नप्रतिष्ठापना कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान 11 ऑगस्ट रोजी श्री मार्कंडेय महामुनींचे प्रतिष्ठापना विधी आणि 12 ऑगस्ट रोजी श्री. मार्कंडेय महानुनीच्या मुळमुर्तीस "शतघटाभिषेक” कार्यक्रम व महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यंदाच्या शतक महोत्सव निमित्त स्मरणिका काढण्यात येत असून त्याचे संपुर्ण काम प्रविण पोटाबत्ती हे पहात आहे. 


यंदाच्या वर्षी शतक महोत्सव निमित्त समाजासाठी ज्यांनी योगदान दिलं आहे, असे सर्वश्री गंगाधर कुचन, कै. इरप्पा बोल्ली, कै. विष्णुपंत कोठे, आडम मास्टर यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे व तसेच समाजाचे तरुण उद्योजकांचा शतक महोत्सवात सत्कार करण्यात येणार आहे, असंही सुरेश फलमारी यांनी यावेळी सांगितले.



या पत्रकार परिषदेस माजी महापौर जनार्दन कारमपुरी, रामचंद्र जन्नू,नरसप्पा इप्पाकायल, मुलीधर आरकाल, संतोष  सोमा, महांकाळ येलदी, रमेश कैरमकोंडा, राकेश पुंजाल, शेखर कटकम, नागेश बंडी यांची उपस्थिती होती.

To Top