Type Here to Get Search Results !

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती प्रवर्गासाठी विविध घटकास अनुदान उपलब्ध


सोलापूर : एकात्मिक फलोत्पादन विकाय कार्यक्रम या अंतर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी सोलापूर जिल्हयाचा रक्कम 20 कोटी 51 लाख 24 हजार कार्यक्रम राबविण्यास मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहे. 

या योजनेतील घटक ड्रॅगन फ्रुट, अॅवोकॅडो, सुट्टी फुले, मसाला पिके, फळबागा पुनरुज्जीवन, सामुहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरीण, शेडनेट हाऊस, हरितगृह, प्लास्टिक मल्चिंग, डाळिंब पिकासाठी अँन्टी हेलनेट कव्हर, द्राक्ष बागांसाठी प्लास्टिक कव्हर, मधुमक्षिका वसाहत व मधुमक्षिका संच, ट्रॅक्टर 20 एचपी पर्यंत, पॉवर टिलर 8 एचपी पेक्षा जास्त व कमी, पिक संरक्षण उपकरणे, पॅक हाऊस, एकात्मिक पॅक हाऊस, पुर्व शीतकरण गृह, शीतखोली, शीतगृह, रेफरव्हॅन, रायपनिंग चेंबर, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, एकात्मिक शीतसाखळी, कांदाचाळ, स्थाई फिरते विक्री केंद्र शीत चेंबरच्या सुविधेसह इत्यादी घटकांचा समावेश आहे.

असे आहेत लाभार्थी निवडीचे निकष

लाभार्थी शेतकऱ्याच्या नावे स्वतःची शेत जमिन असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक राहील, तरी जिल्हयातील अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती व इतर प्रवर्गातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, वरील प्रमाणे घटकाचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टल https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी संबधीत नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी. एस. गावसाने यांनी केलं आहे.