Type Here to Get Search Results !

डॉ. ऋचा आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच जिल्ह्यात आणखी एका डॉक्टर महिलेची आत्महत्या


मोहोळ : तालुक्यातील पेनूर येथे डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. सोलापूर जिल्ह्यातील डॉ. ऋचा रुपनरकर या विवाहित महिलेचे आत्महत्या प्रकरण ताजं असतानाच आणखी एका विवाहित डॉक्टर महिलेनं आत्महत्या करून स्वतःच्या लाईफला फूलस्टॉप दिलाय.

जयश्री प्रशांत गवळी (वय-३८ वर्ष) असं या विवाहित डॉक्टर महिलेचं नांव आहे. डॉ. जयश्री गवळी व त्यांचे पती डॉक्टर प्रशांत गवळी यांचं पेनूर येथे गवळी हॉस्पिटल या नावाने रुग्णालय आहे. त्यांनी शुक्रवारी, दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांनी पेनूर येथील राहत्या घरात विषारी द्रव प्राशन केले. 

त्यानंतर त्यांना पंढरपूर येथील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं, उपचारादरम्यान २:२० मिनिटांनी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं, मात्र डॉक्टर जयश्री गवळी यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप पुढं आलेले नाही.