मोहोळ : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोलापूर जिल्हा ग्रामीण सचिवपदी मोहोळ तालुक्यातील शिंगोली ग्रामपंचायत सदस्य भास्कर भागुजी खटके यांची निवड करण्यात आलीय. जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या हस्ते या निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विचाराचे आणि विकासाचे व्हिजन जनतेत जाऊन तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम येत्या काळात भास्कर खटके करतील आणि जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत होईल, असा विश्वास सोलापूर जिल्हाध्यक्ष साठे यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी पक्ष कार्यालयीन सरचिटणीस महेश माने, प्रदेश लिगल सेल सरचिटणीस अॅड. पवन गायकवाड, मोहोळ तालुकाध्यक्ष विनयकुमार पाटील, मोहोळ कार्याध्यक्ष विक्रम दळवी, युवक तालुकाध्यक्ष विठोबा पुजारी आदिंसह पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.