Type Here to Get Search Results !

विष्णु शिंदे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार

सोलापूर : संत रोहिदास विकास फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य संघटनेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार २०२४  मोहोळ तालुक्यातील अर्जूनसोंड येथील मोहोळ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विष्णू प्रताप शिंदे यांना कल्याण येथील विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. संस्थापक अध्यक्षा सुरेखा निवृत्ती दिघे यांच्या हस्ते कल्याण (जिल्हा ठाणे) येथे देण्यात आला.

विष्णू शिंदे यांनी चर्मकार समाजाला न्याय देण्यासाठी आजवर केलेले प्रयत्न जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला दिलेले काम तसेच लघु उद्योजकांना केलेले सहकार्य या सर्व कार्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी शिदे यांची निवड करण्यात आलीय.

यावेळी विवेकानंद कांबळे (ठाणे)आदिंसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीबद्दल सोलापूर चर्मकार महासंघाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.