सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यंदा पालखी सोहळ्यासोबत चालणार आहेत. तसेच येत्या १२ ते १४ जुलै या दरम्यान त्यांची यात्रा नियोजनाची पाहणी भेट कधीही होऊ शकते, अशी माहिती मुख्यमंत्री सचिवालय ओएसडी मंगेश चिवटे यांनी दिलीय. ते शुक्रवारी पुणे विभागीय आयुक्तांसोबत पालखी महामार्ग आणि पंढरपूर शहरातील यात्रा नियोजन पाहणी दौऱ्यावर होते.
यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. चिवटे म्हणाले की, आषाढी यात्रा नियोजनाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष आहे, निर्मल यात्रा, आरोग्य दायी यात्रा व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री शिंदे सरप्राइज भेट देतील.