Type Here to Get Search Results !

डॉ. मंजूषा शहा ' मिसेस डिजिटल क्वीन ' ने सन्मानित


पुणे : मिसेस इंडिया एम्प्रेस ऑफ द नेशन सीजन 5 ची अंतिम स्पर्धा ( Beauty Contest) 23 जून 2024 रोजी पुणे हायात येथे पार पडली. यात देशभरातील विविध प्रांतातील 54 स्पर्धकांनी स्पर्धकांनी भाग घेतला होता. अंतिम फेरीसाठी आठ स्पर्धक निवडले गेले होते. डॉ. मंजुषा मिलिंद शहा प्रसिद्ध भूलतज्ञ म्हणून सर्वपरिचीत असून सोलापुरातील प्रथितयश हॉस्पिटल "नवल मॅटर्निटी इनफर्टिलिटी अँड एंडोस्कोपी सेंटरच्या" संचालिका आहेत. त्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.

त्यांची अंतिम फेरीसाठी निवड झाली. चार दिवस झालेल्या स्पर्धेची विभागणी तीन विभागात केली होती.  त्यातील  इलाईट कॅटेगरीमध्ये "मिसेस डिजिटल क्वीन" म्हणून डॉक्टर मंजुषा मिलिंद शहा यांची निवड झालीय. त्यांना मिळालेल्या यशाबद्दल सर्व थरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे. 

यासाठी त्यांनी शारीरिक, बौद्धिक आणि कलात्मक गुण वाढविण्यासाठी सहा महिने मेहनत घेतली. आपल्या या यशामागे त्यांचं कुटुंबीय आणि सर्व मित्र परिवारांचे आशीर्वाद आणि सहकार्य असल्याचे त्यांनी विनम्रपणे नमूद केलंय.