सोलापूर : येथील श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे उपाध्यक्ष व सिद्धेश्वर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष रामकृष्ण उर्फ बाबुराव विश्वनाथ नष्टे यांचे रविवारी, ०७ जुलै रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या (सोमवारी) सकाळी ११ वाजता जोडभावी पेठेतील त्यांच्या राहत्या निवासस्थानापासून निघणार आहे.
सिद्धेश्वर मार्केट यार्डातील जुन्या काळातील प्रतिष्ठित व्यापारी अशी त्यांची ओळख होती. रेवणसिद्धेश्वर समाजसेवा मंडळाचे ते माजी अध्यक्ष होते. श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे ऑफिस सेक्रेटरी म्हणूनही त्यांनी काम पाहिले. विविध सामाजिक व धार्मिक कार्यात यांचा सहभाग असे. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, सुना-नातवंडे असा परिवार आहे.