उपमुख्यमंत्री पवार आणि प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचा वाढदिवस; शवविच्छेदन विभागातील डॉक्टर-कर्मचाऱ्यांचा सन्मान

shivrajya patra


सोलापूर :  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय कक्ष विभाग प्रदेशाध्यक्ष जितेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली व सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार व जिल्हा कार्याध्यक्ष जुबेर बागबान यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्षाचे शहराध्यक्ष बसवराज कोळी यांनी सोमवारी, २२ जुलै रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार सिव्हील हॉस्पिटल  येथील P M विभागातील डॉक्टर व कर्मचारी यांचा शाल आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.



या सत्कार प्रसंगी अल्पसंख्याकचे अध्यक्ष अमीर शेख, मध्य विधानसभा अध्यक्ष आलमराजे आबादीराजे, वैद्यकीय उपाध्यक्ष आकाश जमादार, शेखर सलमेडा, तन्वीर गुलजार, अशपाक कुरेशी, मुईज मुल्ला, सुलेमान शेख, रेहान शेख व मित्र परिवार यांची उपस्थिती होती.

To Top