Type Here to Get Search Results !

गाढवे वस्ती परिसरातून जर्सी गाईंची चोरी

                              


                                                                   (प्रतिकात्मक छायाचित्र)

मोहोळ : सुमारे ८० हजार रुपये किंमतीच्या दोन जर्सी गायी चोरीस गेल्या. ही घटना मोहोळ येथील गाढवे वस्तीत रविवारी पहाटे पूर्वी घडलीय. या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेमुळे शेतकरी वर्गात भयाचे सावट पसरले आहे.

त्याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, गाढवे वस्ती येथील शिवाजी नारायण सलगर यांच्या गट क्रमांक ८८७ मध्ये त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी बांधलेल्या एक काळी पांढरी बाडी रंगाची एक जर्सी गाय व  दोन महिन्याची गाबण असलेली जर्सी गाय अशा दोन गाई अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे रविवारी सकाळी निदर्शनास आले.

याप्रकरणी शिवाजी सलगर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार मोहोळ पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध BNS कलम 303 . (2)प्रमाणे गुन्हा दाखल केला. WASI /घोळवे या गुन्ह्याच्या अधिक तपास करीत आहेत.