"अवयव दान ही जीवन वाचवणारी कृती आहे. हे मानवतेसाठी सर्वात नि:स्वार्थी कृत्यांपैकी एक आहे" : डॉ. संजीव जाधव
सोलापूर : नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथे हृदय प्रत्यारोपणानंतर हृदयविकाराच्या शेवटच्या टप्प्यातील १० रुग्णांना नवे जीवन मिळाले आहे. अपोलो हॉस्पिटल्स हे जेसीआयद्वारे मान्यताप्राप्त असून एक प्रगत बहु-वैशिष्ट्ये असलेले रुग्णालय आहे. या रुग्णालयाने हृदय प्रत्यारोपणाच्या १० शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करून हृदय प्रत्यारोपणामध्ये मोठे शिखर गाठले आहे, असं अपोलो हॉस्पिटल्सचे सीव्हीटीएसचे वरिष्ठ सल्लागार, हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपणाचे शल्यविशारद डॉ. संजीव जाधव यांनी शनिवारी मोलापुरात पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना सांगितले.
नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथील सीव्हीटीएसचे वरिष्ठ सल्लागार, हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपणाचे शल्यविशारद डॉ. संजीव जाधव यांच्या नेतृत्वाखालील हृदय प्रत्यारोपण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून हे हृदय प्रत्यारोपण करण्यात आले होते. विशेष म्हणजे हे रुग्ण सर्व वयोगटातील म्हणजेच २९ ते ५६ वर्षे वयोगटातील होते आणि त्यांच्यावर करण्यात आलेले प्रत्यारोपण १०० टक्के यशस्वी झाले आहे. ते ऑनलाईन पध्दतीने जोडले होते.
नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथील सीव्हीटीएसचे वरिष्ठ सल्लागार, हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपणाचे शल्यविशारद डॉ. संजीव जाधव हृदय प्रत्यारोपणाच्या प्रवासाबद्दल आणि यशाबद्दल बोलताना म्हणाले, हृदयरोगाच्या शेवटच्या टप्प्यात असणाऱ्या रुग्णांना हृदय प्रत्यारोपणामुळे जगण्याची दुसरी संधी मिळते. अपोलो हॉस्पिटल्समध्ये, आम्ही एक व्यापक हृदय प्रत्यारोपण कार्यक्रम प्रदान करतो, जो शेवटच्या टप्प्यातील हृदयरोग असलेल्या व्यक्तींमाठी जीवन वाचवणारा उपाय ठरतो. आम्ही आजपर्यंत १०० टक्के यशाच्या दरासह १० हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पाडली आहे, हे अद्भुत यश मिळवल्यावद्दल आम्हाला खूपच अभिमान वाटत आहे." असंही त्यांनी यावेळी म्हटले.
"ही हृदय प्रत्यारोपणाची प्रक्रिया म्हणजे नवीन बाय-कॅव्हल टेक्निक होती, ज्यामध्ये रोगग्रस्त किंवा निकामी आलेले हृदय काढून टाकले जाते आणि त्याच्या जागी दात्याचे निरोगी हृदय बसवले जाते. बाय-कॅव्हल टेक्रिकद्वारे अॅट्रिया किंवा हृदयाच्या वरच्या चेंबरची सामान्य शरीर रचना राखून ठेवली जाते आणि शस्त्रक्रिया दरम्यान व शस्त्रक्रियेनंतरची गुंतागुंत खूपच कमी होते." असं डॉ. जाधव यांनी अनुभव कथन केले.
"अवयवदान म्हणजे जीवन वाचवणारी आणि हृदयविकार असलेल्या रुग्णांना जगण्याची दुसरी संधी देणारी अद्भूत परोपकारी कृती आहे. या रूग्णांमध्ये यशस्वी हृदय प्रत्यारोपण करण्यात आले व त्यांना नवे जीवन मिळाले, यामुळे आम्हाला आशा आहे की, अवयव दानाच्या अत्यंत महत्वाच्या गरजांबद्दल जागरूकता वाढेल आणि अधिक लोकांना त्यांचे अवयव दान करण्यासाठी प्रेरणा मिळेल."
असं हृदय प्रत्यारोपणानंतर झालेल्या परिवर्तनाच्या या यशोगाथांवर प्रकाश टाकताना डॉ. संजीव जाधव यांनी स्पष्ट करून अवयव प्रत्यारोपणाच्या व्यापक सामाजिक फायद्यांवरही त्यांनी आपले मत मांडले.
२०१७ पासून, नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने ३४८ मूत्रपिंड प्रत्यारोपण, २०४ यकृत प्रत्यारोपण आणि १० हृदय प्रत्यारोपण पार पाडले आहेत. आम्ही झेडटीसीसी (झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर) आणि वाहतूक नियामक प्राधिकरणाचे आभारी आहोत, कारण वेळेवर अवयव प्राप्त करण्यासाठी त्यांनी प्रशासनात्मक आणि ग्रीन कॉरिडॉर मार्ग मोकळा करुन मोठे सहकार्य केले आहे. अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही दात्याच्या कुटुंबांचे देखील आभारी आहोत आणि आम्ही त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आम्हाला विश्वास आहे की, या यशस्वी प्रत्यारोपणामुळे अधिकाधिक लोकांना अवयव दान करण्यास प्रेरणा मिळेल आणि भविष्यात आम्हाला अधिक लोकांचा जीव वाचविण्यात मदत होईल."
नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सबद्दलः जेसीआय मान्यताप्राप्त असलेले नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स हे मुंबई आणि नवी मुंबईतील सर्वात प्रगत बहु-वैशिष्ट्ये असलेले वैद्यकीय उपचार पुरवणाऱ्या रुग्णालयांपैकी एक आहे. हे रुग्णालय एका छताखाली सर्वसमावेशक आणि एकात्मिक उत्कृष्ट वैशिष्ट्य असलेली सेवा प्रदान करते, ज्यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय किर्तीचे उच्च अनुभवी डॉक्टर तसेच परिचारिका, तंत्रज्ञ आणि इतर सहाय्यक कर्मचारी यांचा देखील समावेश असल्याचे शेवटी सांगितले.
अधिक माहितीसाठी, कृपया संपर्क साधाः
सरिता लॉरेन्सः sarita_1@apollohospitals.com | 7208066222
राजेश दाभाडेः rajesh.dabhade@adfactorspr.com | 9594061617
अदिती पाटीलः aditi.patil@adfactorspr.com | 8655579183
..... चौकट .....
जीवन वाचवणारी प्रक्रिया म्हणून हृदय प्रत्यारोपण
जेव्हा अंतीम टप्प्यातील हृदय निकामी झाल्याची समस्या उद्भवते आणि जेव्हा इतर सर्व वैद्यकीय उपचार रुग्णाची समस्या सोडवण्यात अपयशी ठरतात, तेव्हा हृदय प्रत्यारोपण ही एक महत्वाची आणि जीवन वाचवणारी प्रक्रिया म्हणून समोर येते. या प्रक्रियेमध्ये मृत दात्याकडून हृदय घेतले जाते व निकामी झालेल्या हृदयाच्या जागी निरोगी हृदय बसवले जाते. भारतात हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेमध्ये सर्वोत्तम परिणाम प्राप्त करण्यासाठी प्रत्यारोपणाची टीम, जलद वाहतूक प्रणाली आणि दाता व प्राप्तकर्ता यांच्यामधील अचूक समन्वयाची आवश्यकता आहे.
........ चौकट .....
... असा आहे हृदय प्रत्यारोपण उपचारांचा प्रवास !
हृदय प्रत्यारोपणामुळे ज्या रुग्णांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडून आला, त्यांचा परिचय डॉ. जाधव यांनी करून दिला. यामध्ये पहिले यशस्वी प्रत्यारोपण केलेले कळव्यातील रुग्ण देखील होते, २७ जुलै २०१९ मध्ये वयाच्या ३३ व्या वर्षी त्यांच्यावर ही जीवनरक्षक प्रक्रिया करण्यात आली होती.
तसेच सर्वात तरुण म्हणजे २९ वर्षीय पुरुष रुग्णावर हृदय प्रत्यारोपणाची प्रक्रिया करण्यात आली. त्याच्यामध्ये डायलेटेड कार्डिओमायोपॅथी (डीसीपीएम) आणि १५ टक्के लेफ्ट वेंट्रिक्युलर इंजेक्शन फ्रॅक्शन (एलव्हीईएफ) चे निदान झाले होते. १५ जुलै २०२१ रोजी त्याच्यावर ऑर्थोटॉपिक बाय-कॅव्हल हृदय प्रत्यारोपण करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर, त्याच्या एलव्हीईएफ मध्ये ६० टक्के पर्यंत वाढ होऊन त्याच्यामध्ये उल्लेखनीय सुधारणा दिसून आली. ३ ऑगस्ट २०२१ रोजी त्याला डिस्चार्ज देण्यात आला आणि आज तो परिपूर्ण आयुष्य जगतोय.
इस्केमिक कार्डिओमायोपॅथी आणि १० टक्के एवढे इजेक्शन फ्रॅक्शन (ईएफ) असलेल्या ४० वर्षीय पुरुष रुग्णाला देखील या प्रक्रियेद्वारे जीवनाची नवी आशा मिळाली. २० ऑक्टोबर २०२२ रोजी त्याच्यावर ऑर्थोटॉपिक बाय-कॅव्हल हृदय प्रत्यारोपण प्रक्रिया करण्यात आली, त्यांनंतर शस्त्रक्रियेनंतरच्या इकोकार्डियोग्राममध्ये त्यांच्यात ५० टक्के ईएफ दिसून आले. १६ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तेव्हापासून ते पुन्हा सामान्य जीवन जगू लागले आहेत.
एक खूप आव्हानात्मक प्रकरण म्हणजे ४० वर्षाचे पुरुष रुग्ण, जे रिस्ट्रिक्टिव्ह इनफिल्ट्रेटिव्ह कार्डिओमायोपॅथी आणि हृदयाच्या एमायलोइडोसिसने ग्रस्त होते. त्यांच्यावर ४ मे २०२२ रोजी यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले आणि त्याच्यात लक्षणीय सुधारणा दिसून आली. परिणामी उत्कृष्ट बाय-वेंट्रिक्युलर कार्य दिसून आल्यामुळे त्यांना २२ मे २०२३ रोजी डिस्चार्ज देण्यात आला.
डीसीएमपी आणि १० टक्के ईएफ असलेले ३१ वर्षीय पुरुष रुग्ण, यापूर्वी डिसेंबर २०२२ मध्ये हृदयविकाराच्या झटक्यातून बचावले होता. पुढे ६ डिसेंबर २०२३ मध्ये त्यांच्यावर यशस्वी हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली. ज्यामुळे शस्त्रक्रियेनंतर ईएफ ५० टक्के झाले आणि म्हणून २२ डिसेंबर २०२३ रोजी या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला.
अलीकडेच घडलेली यशोगाथा म्हणजे, इस्केमिक डीसीएमपी आणि २० टक्के ईएफ असलेल्या ३० वर्षीय पुरुषाची कहाणी. १५ मार्च २०२४ रोजी त्यांच्यावर प्रत्यारोपण करण्यात आले, त्यानंतर ४ एप्रिल २०२४ रोजी शस्त्रक्रियेनंतर चांगला इकोकार्डिओग्राम आला आणि ते लवकर बरे झाले म्हणून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. हृदय प्रत्यारोपण केलेल्या सर्व १० रुग्णांमध्ये शस्त्रक्रियेनंतर उल्लेखनीय सुधारणा दिसून आली. ते आजपरिपूर्ण आयुष्य जगत आहेत.
.... चौकट .....
विविध क्षेत्रातील तज्ञांचा पाठिंब्यामुळेचं यश : डॉ. जाधव
"हृदय प्रत्यारोपणात १०० टक्के यशाचा टप्पा गाठणे ही खरंच खूप अभिमानाची बाब आहे. हा नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथील आमच्या चिकित्सक आणि हृदय प्रत्यारोपण टीमच्या कौशल्याचा पुरावाच आहे.
अपोलोच्या महत्वाचे अवयव प्रत्यारोपण कार्यक्रमात हृदय, फुफ्फुस, मूत्रपिंड आणि यकृत प्रत्यारोपणाचा समावेश आहे, हे प्रत्यारोपण प्रख्यात शल्यचिकित्सकांच्या नेतृत्वात पार पाडले जाते आणि या टीमला नेफ्रोलॉजिस्ट, हेपॅटोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट, रेडिओलॉजिस्ट, प्रत्यारोपण समन्वयक, सामाजिक कार्यकर्ते, मानसोपचारतज्ञ आणि भूलतज्ञांसह विविध क्षेत्रातील तज्ञांचा पाठिंबा असतो, अशीही डॉ. जाधव यांनी यशाची मिमांसा केली.