Type Here to Get Search Results !

वीज मंडळ तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था कोषाध्यक्षपदी सुनिल काळे यांची बिनविरोध निवड


सोलापूर : येथील वीज मंडळ तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित, सोलापूरची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. नूतन संचालक तथा विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे सोलापूर मंडळ अध्यक्ष सुनिल काळे यांची पतसंस्थेच्या "कोषाध्यक्ष" पदी बिनविरोध निवड करण्यात आली. 

वीज मंडळ तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित, सोलापूर. पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. सन २०२३-२४ ते २०२८-२९ या कालावधी करीता नूतन संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच नूतन संचालकांमधून पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. यावेळी कोषाध्यक्षपदावर सुनिल काळे यांची अविरोध निवड झाली.



यानिमित्ताने अपरिचित सामाजिक संस्था, सोलापूर संस्थापक अध्यक्ष मयुर गवते व महावितरण औद्योगिक वसाहत कार्यालयातील सहकारी जनमित्र व यंत्रचालक यांच्या वतीने कोषाध्यक्ष सुनिल काळे यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी मयुर गवते, धुळप्पा टेळे, निलकंठ कांबळे, गुंडप्पा बनसोडे, नितीन कोळी, अपेक्षा बहादुरे मॅडम, हिना बागवान मॅडम आदी उपस्थित होते.