सोलापूर : राष्ट्रीय लोकअदालत मध्ये जास्तीत जास्त प्रकरणे मिटविण्यात यावीत तसेच लोकअदालत मध्ये प्रकरण तडजोडी करून मिटविल्यास वादी व प्रतिवादी यांच्या मध्ये निर्माण झालेली द्वेष भावना सपुंष्टात येईल, त्यामुळे एकमेकांबद्दल आदर निर्माण होईल, असे प्रतिपादन येथील प्रमुख जिल्हा न्यायाधीश मो. सलमान आझमी यांनी केले.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे आदेशाप्रमाणे दि. 27 जुलै रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे सोलापूर शहर व सर्व तालुक्यामधील न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकन्यायालयाचे उद्घाटन राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांनी तयार केलेले "एकमुठ्ठी आसमान" या गीताने करण्यात आले.
या उद्घाटन प्रसंगी पॅनलवरील सर्व न्यायिक अधिकारी, पी. एस. खुणे, जिल्हा न्यायाधीश-2. महाराष्ट्र व गोवा बार कॉन्सिलचे सदस्य श्री. मिलिंद थोबडे, जिल्हा सरकारी वकील श्री प्रदीपसिंह रजपूत, सोलापूर विधिज्ञ संघाचे अध्यक्ष श्री अमित आळंगे, विधिज्ञ संघाचे सर्व पदाधिकारी, सौ. पल्लवी पैठणकर जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक, लोकअभिरक्षक कार्यालयातील सर्व विधिज्ञ, तसेच जिल्हा न्यायालय सोलापूर कर्मचारी उपस्थित होते.
लोक न्यायालयामध्ये जिल्हयात एकूण 39 पॅनल निर्मिती करण्यात आली होती. सदर लोक न्यायालयामध्ये दिवाणी, फौजदारी, मोटार वाहन प्रकरणे, भुसंपादन, दरखास्त व कलम 138 चलनक्षम कायद्याची तसेच कौटुंबिक वाद वगैरेची न्यायप्रविष्ट प्रकरणे व तसेच बँका, टेलिफोन कंपनी, विविध वित्तीय संस्था यांची दाखलपूर्व प्रकरणे तसेच वाहतुक शाखा, सोलापूर ई-चलन प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती.
लोक न्यायालय हे प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर सलमान आझमी, व दिवाणी न्यायाधीश व स्तर तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर उमेश देवर्षी यांच्या मार्गदर्शनाखाली व वकिल संघटना व पक्षकार यांचे सहकार्याने संपन्न झाले. यावेळी बोलताना तडजोडीत दोन्ही पक्षाचा विजय होतो. चलनक्षम दस्तावेजमधील प्रकरण लोक न्यायालयामध्ये मिटविल्यास वादीस पूर्णपणे न्यायालय मुद्रांक परत मिळेल पक्षकार यांचा वेळ, पैसा, श्रमही वाचेल, असंही प्रमुख जिल्हा न्यायाधीश मो. सलमान आझमी यांनी म्हटले.
लोक अदालतीमध्ये 1 लाख 22 हजार 906 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती, त्यापैकी 7 हजार 87 प्रलंबित प्रकरणात तडजोड झाली व 4 हजार 326 दाखलपुर्व प्रकरणे असे एकूण 11 हजार413 आपापसात तडजोडीने निकाली काढण्यात आली. व रु. 1144562834/- (अक्षरी एकशे चौदा कोटी पंचेचाळीस लाख बासष्ठ हजार आठशे चौतीस एवढ्या रकमेची तडजोड करण्यात आली. या लोक अदालतीमध्ये शहर वाहतूक व ग्रामीण शाखा सोलापूरचे ई-चलनद्वारे 20 लाख 55 हजार इतकी रक्कम वसूली झाली.
सोलापूर जिल्हा न्यायालयातील पॅनलवर न्यायाधीश वाय. ए. राणे, श्रीमती जे. एम. काकडे, एस. डी. गावडे, पी. पी. पेठकर, डी. आर. भोला, व्ही. एम. रेडकर, एस. आर. सातभाई, डी. जी. कंखरे, एस. पी. पाटील, व्ही. पी. कुंभार, श्रीमती एम. के कोठुळे, श्रीमती एम. पी. मर्डेकर, श्रीमती व्ही. ए. कुलकर्णी या न्यायीक अधिकाऱ्यांनी काम पाहिले. तसेच पॅनल सदस्य म्हणून लोकअभिरक्षक कार्यालयातील विधिज्ञ सौ. स्नेहल राऊत, झुरळे, सोलनकर, रेवण पाटील, नवले, म्हेत्रे, श्रीमती किणगी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पॅनलवरील कुर्ले व श्रीमती मोरडे यांनी काम पाहिले.
स्पेशल ड्राईव्ह
लोकन्यायालयाच्या अगोदर मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 5 दिवस स्पेशल ड्राईव्ह प्रत्येक प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालयात नेण्यात आला. सोलापूर जिल्हयामध्ये सदर पाच दिवसांमध्ये 3442 प्रकरणे निकाली काढण्यात आली.
लोकन्यायालयाची मुद्देसूद माहिती खालीलप्रमाणे :-
प्रलंबित प्रकरणे- एकूण ठेवलेली प्रलंबित प्रकरणे 57012. एकूण तडजोड झालेली प्रलंबित प्रकरणे 7087, प्रलंबित प्रकरणातील तडजोड रक्कम 965803393/-
दाखलपूर्व प्रकरणे- एकूण ठेवलेली दाखलपूर्व प्रकरण 65894, एकूण तडजोड झालेली दाखलपूर्व प्रकरणे 4326 दाखलपूर्व प्रकरणातील तडजोड रक्कम- 178759441/, ऑनलाईन व व्हॉट्सअप (आभासी पध्दतीने) तडजोड प्रकरणे 28 . तडजोड झालेली वैवाहिक प्रकरणे 46
तालुका निहाय प्रकरणांची माहिती
तालुका विधी सेवा समितीचे नांव- सोलापूर - एकूण तडजोड प्रकरणे-5086 तडजोड रक्कम -372868168
अक्कलकोट- एकूण तडजोड प्रकरणे-783, तडजोड रक्कम- 12259375,
बार्शी- एकूण तडजोड प्रकरणे-2155, तडजोड रक्कम- 263715245,
माढा- एकूण तडजोड प्रकरणे-848, तडजोड रक्कम -239444718,
मोहोळ- एकूण तडजोड प्रकरणे -154, तडजोड रक्कम -26565407,
माळशिरस - एकूण तडजोड प्रकरणे -1033, तडजोड रक्कम-59987417
मंगळवेढा- एकूण तडजोड प्रकरणे-150, तडजोड रक्कम -32929769,
पंढरपूर-तडजोड प्रकरणे-164, तडजोड रक्कम -61880654,
करमाळा- तडजोड प्रकरणे -257, तडजोड रक्कम -64054834,
सांगोला - तडजोड प्रकरणे-783, तडजोड रक्कम -10857247.
ही लोक अदालत यशस्वी करण्याकरिता जिल्हा न्यायाधीश आर. जे. कटारिया, मुख्य न्याय दंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर शंतनु जहागीरदार, धर्मदाय उपायुक्त प्रवीण कुंभोजकर, न्यायाधीश श्रीमती दीप्ती कोळपकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले, अशी माहिती अधिक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर ए.जी. नदाफ यांनी दिली.