सोलापूर : येथील साखर पेठ, आशिकल मैदान ए. आर. बुर्ला महिला महाविद्यालय नजिकचे रहिवासी रियाज अब्दुल गनी हवालदार यांचं बुधवारी, २४ जुलै रोजी दुपारी शासकीय इस्पितळात उपचारादरम्यान निधन झाले. ते मृत्यू समयी ५० वर्षीय होते. त्यांची अंत्ययात्रा बुधवारी रात्री ८.३० वा. त्यांच्या राहत्या घरापासून आशिकल मैदान येथून निघून अक्कलकोट रोडवरील जडेसाब मुस्लिम कब्रस्थान येथे त्यांचा दफन विधी (सुपूर्द-ए-खाक) होणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून-नातवंडे असा परिवार आहे.