सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती शंकरराव यल्लप्पा मुधोळकर यांचं मंगळवारी सकाळी आजारानं निधन झालं. उद्या, ३ जुलै रोजी सकाळी १० वाजता मड्डी वस्ती येथील राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार असून रूपा भवानी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. ते ८५ वर्षीय होते.
शंकरराव मुधोळकर सोलापूर महानगरपालिकेवर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मड्डी वस्ती भागातून ५ वेळा निवडून आले होते. त्यांनी महानगरपालिकेत विविध पदावर कार्य केलं होतं. दांडग्या जनसंपर्काचे नेते म्हणूनही मुधोळकर यांच्याकडं पाहिलं जात होतं.
राज्य पातळीवर वडार समाजाच्या कार्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असे. सोलापूर शहरातील विविध विकास कामांमध्ये शंकरराव मुधोळकर यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या पश्चात ४ विवाहित मुलं, मुली, सुना, नातवंडं असा परिवार आहे.