Type Here to Get Search Results !

शेतकरी व बेरोजगार तरुणांनी घ्यावा मधकेंद्र योजनेचा लाभ; लाभार्थ्यांना सोलापूर, महाबळेश्वर येथे प्रशिक्षण

सोलापूर : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळा मार्फत मधकेद्र योजना राज्यात सर्वत्र राबविण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील इच्छुक शेतकरी व बेरोजगार तरुणांनी या योजनेचा लाभ घेऊन आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी ध्रुवकुमार बनसोडे यांनी केले.

मधमाशापालन उद्योग करण्यास ईच्छुक पात्र व्यक्तीकडून अर्ज मागविण्यात येत असून 26 जुलै 2024 पर्यंत अर्ज करावेत. प्रशिक्षणासाठी निवड केलेल्या लाभार्थीना सोलापूर व मधसंचालनालय, महाबळेश्वर, येथे मधमाशापालनाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर मधमाशापालन उद्योग करण्यासाठी लागणारे मधपेट्या मधयंत्र व इतर साहित्य खरेदी साठी लागणारी एकूण रक्कमेच्या 50 टक्के अनुदान व 50 टक्के रक्कम स्वगुंतवणूक लाभार्थिना भरावयाची आहे. मधपाळांकडून उत्पादीत होणारा मध मंडळाकडून हमी भावाने खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती बनसोडे यांनी दिली.



वैयक्तिक मधपाळासाठी पात्रता अर्जदार साक्षर असावा स्वतःची शेती असल्यास प्राधान्य वय 18 वर्षापेक्षा जास्त व  त्यांनी 10 दिवसाचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. प्रगतशील मधपाळ (केंद्र चालक) पात्रता किमान 10 वी पास वय 21 वर्षापेक्षा जास्त अशा व्यक्तीच्या नांवे किंवा त्याव्यक्तीच्या कुंटुबातील व्यक्तीच्या नांवे किमान एक एकर शेतजमीन किंवा भाडेतत्वावर घेतलेली शेत जमीन लाभार्थीकडे आसणे आवश्यक आहे. तसेच मधमाशापालन प्रजनन व मध उत्पादना बाबतीत लोकांना प्रशिक्षण देणेची क्षमता व सुविधा असावी.

लाभार्थीची प्रशिक्षणासाठी निवड झालेनंतर त्यांनी मधपेट्या व इतर साहित्याची 50 टक्के स्वगुतंवणूक रक्कम प्रशिक्षणापुर्वी भरणे आवश्यक आहे. आधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, यांचे कार्यालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, सोलापूर, जिल्हा कार्यालय सोलापूर व्दारा :- जिल्हा उद्योग केंद्र, किनारा हॉटेलसमोर, होटगी रोड, सोलापूर दुरध्वनीः- (०२१७) २६००१२८.सोलापूर-४१३००३. येथे संपर्क करावा अथवा मा. संचालक मधसंचालनालय, सरकारी बंगला क्र. ५ शसकीय डेअरी शेजारी, महाबळेश्वर, दुरध्वनी क्र. ०२१६८-२६०२६४. येथेही संपर्क साधावा, असेही  जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बनसोडे यांनी पत्रकान्वये कळविले आहे.