सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगे येथील प्रा. संजय जाधव यांची सुकन्या कु. स्नेहल आणि सोलापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर नानासाहेब काळे यांचे चिरंजीव गौरव यांचा शिवविवाह श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना, कार्यस्थळावरील कर्मयोगी मंगल कार्यालयात मंगळवारी, ०९ जुलै रोजी दुपारी कृषक व्यवस्थेचा राजा बळीराजा आणि राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन करून शिवधर्म पध्दतीने मोठ्या थाटात पार पडला. या शिव विवाह सोहळ्याकडं भयमुक्तीकडं वाटचाल या भावनेने पाहिलं गेलं.
या शिवविवाह सोहळ्याला शुभाशिर्वाद देण्यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री तथा ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे, जिजाऊंच्या माहेरकडील वंशज शिवाजीराजे जाधव - राजे, खासदार धैर्यशिल मोहिते-पाटील, खासदार प्रणिती शिंदे, मनोरमा परिवाराचे प्रमुख श्रीकांत मोरे, पुरुषोत्तम बरडे, माजी महापौर मनोहर सपाटे, महेश गादेकर, जयकुमार माने, नागेश ताकमोगे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, संतोष पवार, मनिष देशमुख, अमोलबापू शिंदे, माऊली पवार, अजिंक्यराणा पाटील, रवी गायकवाड ,अजित गायकवाड, बाळासाहेब वाघमारे, केदार उंबरजे, राजनभाऊ जाधव,भारत जाधव, धनुभैय्या भोसले, माजी आमदार रवि पाटील, विनोद भोसले, दत्ता मामा मुळे, गणेश डोंगरे, श्रीकांत डांगे, तौफिक शेख, डाॅ. पृथ्वीराज माने, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, महेश कोठे, आनंद चंदनशिवे, अक्कलकोट नगरीचे अमोलराजे भोसले, बिज्जु प्रधाने, श्रीकांत घाडगे, ज्ञानेश्वर सपाटे, राजाभाऊ काकडे, प्रकाश वाले, प्रकाश वानकर, प्रल्हाद काशीद, उपजिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड, डाॅ. जी. के. देशमुख, सुर्यकांत पाटील, चेतन नरोटे, सुशिल बनपट्टे यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणीक बॅकींग, सहकार, संस्थाचालक, सर्व संघटनांचे प्रमुख, माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत या सर्व मान्यवर मंडळीसोबत सर्व पाहुणे मंडळी मित्रमंडळी, या सर्वांच्या शिवार्शिवादाने आनंददायी सोहळ्यास उपस्थित राहून वधू-वरांना शिव आशीर्वाद दिले.