सोलापूर : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त रायगड च्या पुण्यभूमीसह संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात राज्याभिषेक सोहळा दिमाखदार वातावरणात संपन्न होत आहे. सोलापुरात देखील श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्यास माजी केंद्रिय मंत्री सुशीलकुमार शिंदे, जिल्ह्याच्या नूतन खासदार प्रणिती शिंदे, पालिका आयुक्त डॉ. शितल तेली-उगले, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आकर्षक अशी सजावट करण्यात आल्याने शिवप्रेमींमधून आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी उपस्थित शिवप्रेमींनी 'जय भवानी, जय शिवाजी' 'छत्रपती संभाजी महाराज की जय' च्या घोषणा दिल्या.
या प्रसंगी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नाना काळे, ट्रस्टी सदस्य राजन जाधव, पुरुषोत्तम बरडे, सुनील रसाळे, हाजी मतीन बागवान, प्रकाश ननवरे, अॅड. प्रीतम परदेशी, माजी नगरसेवक सी. ए, विनोद भोसले, श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष सुभाष पवार, सुशील बंडपट्टे, माजी सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक सूर्यकांत पाटील, प्रा. गणेश देशमुख,गोवर्धन गुंड, हणमंत पवार, राजू व्यवहारे, नितीन मोहिते, सचिन चव्हाण,भाऊसाहेब रोडगे, श्रीकांत गायकवाड, अंबादास शेळके, अंबादास सपकाळ, सदाशिव पवार, प्रसिद्धी प्रमुख वैभव गंगणे, बसवराज कोळी, परशुराम पवार, संभाजी कोडगी, शाहू सलगर, प्रतापसिंह चौहान, उज्वल दीक्षित, राज सलगर, प्रा. गणेश देशमुख, शिवाजी खमितकर, सुधीर गावडे, आकाश चव्हाण, दत्ता जाधव, सचिन स्वामी, देविदास घुले, गणेश डोंगरे, विजय पुकाळे यांच्यासह मध्यवर्ती महामंडळाचे सर्वच प्रमुख पदाधिकारी व तमाम शिवप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीकुमार शिंदे, सोलापूर जिल्ह्याच्या नूतन खासदार प्रणिती शिंदे, पालिका आयुक्त डॉ. शितल तेली-उगले यांनी सोलापूर शहर-जिल्हा वासियांना राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या.