राजा असूनही लोकशाही पध्दतीने राज्य करणारा राजा
सोलापूर : सातशे वर्षाच्या गुलामीवर प्रहार करून व राज्यभिषेकाला विरोध करणाऱ्या व्यवस्थेवर पाय देऊन शिवरायांनी रयतेचे स्वराज्य निर्माण करून ०६ जून १६७४ या सुवर्ण दिनी, आपला राज्याभिषेक केला. छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने लोकशाहीचे प्रणेते होते, असे मत श्याम कदम यांनी व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५१ वा राज्याभिषेक दिनानिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने महाराजांच्या मूर्तीवर गुलाबाची पुष्पवृष्टी करून तसेच मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. उपस्थित शिवशंभूप्रेमींना शिवराज्याभिषेक दिनाच्या अर्थात स्वराज्य दिनाच्या शिवमय शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शहराध्यक्ष श्याम कदम बोलत होते.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपाध्यक्ष सिताराम बाबर, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, शहराध्यक्ष मोनाली धुमाळ, रमेश चव्हाण, वैभव धुमाळ, लखन गायकवाड, राजेंद्र माने, रुपेश शिरसावलगी, शेखर स्वामी, तुळशीराम राठोड, सिद्धाराम कोरे, ज्ञानेश्वर कदम आदी उपस्थित होते.