सोलापूर : नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व विद्याचंद्र विनायक होमकर (वय 83. रा. A-9 कर्णिक नगर, शुभंकरोती गणेश मंदिर जवळ, सोलापूर) यांचे सोमवारी दुपारी 3:30 वा. अल्पशः आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरातून रात्री 9:30 वा. निघून अक्कलकोट रोड स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चंडक पॉलिटेक्निक कॉलेजचे लॅब असिस्टंट नागेश होमकर यांचे ते वडील होत. लोकमतचे पत्रकार दीपक होमकर यांचे ते चुलते होत.