Type Here to Get Search Results !

डॉ. साळुंखेंना युएमए दिल्लीचा एज्युकेशन आयकॉन पुरस्कार; १५ जूनला हॉटेल प्रेसिडेंट मुंबई येथे वितरण


सोलापूर : शारदा विद्यापीठाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राज साळुंखे यांना युनिव्हर्सल मेंटर्स असोशिएशन, दिल्ली या नामांकित संस्थेचा 'एज्युकेशन आयकॉन आफ द इयर' पुरस्कार जाहीर झाला असून मुंबई येथील पंचतारांकित हॉटेल प्रेसिडेंट मध्ये १५ जून रोजी शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रख्यात शिक्षण संस्था असलेल्या  युनिव्हर्सल मेन्टर्स असोशियशन दिल्ली कडून शैक्षणिक क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जातो. 

शैक्षणिक क्षेत्रातील अद्ययावत बदलासाठी काम करणाऱ्या युनिव्हर्सल मेन्टर्स असोशियशन या संस्थेकडून १५ जूनला मुंबईतील पंचतारांकित हॉटेल  प्रेसिडेंटमध्ये एज्युलिडर्स  ही शैक्षणिक परिषद आयोजित केली असुन पुरस्कारानंतर प्रा.डाॅ.राज साळुंखे यांचे नेव्हीगेटिंग एज्युकेशनल चॅलेंजस इन ट्वेन्टीफस्ट सेन्च्युरीः  स्ट्राटेजीज फाॅर स्कूल लीडर्स या विषयावर लेक्चर होणार असून दुसऱ्या सत्रात बिल्डिंग इन्क्लुजिव अँन्ड डायव्हर्स लर्निग एन्व्हायराॅन्मेंट : एक डायलॉग फाॅर एज्युकेशन लीडर्स या विषयावरील चर्चासत्रात ते सहभागी  होणार आहेत. 

प्रा. डॉ. राज साळुंखे यांनी आजवर इंदौर, अहमदाबाद, दिल्ली, बेंगलोर, हैद्राबाद येथील रराष्ट्रीय तर इंग्लंड व मलेशिया येथील आंतरराष्ट्रीय शिक्षणपरिषदेत अनेक विषयावर लेक्चर्स दिले असून, अनेक चर्चासत्रात सहभागी होत शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांच्या निवडीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे.