इचलकरंजी : येथील टाकवडे वेस भागातील प्रतिष्ठित नागरिक श्रीमती शकुंतला बाजीराव कांबळे (वय-७५ वर्षे) यांचे रविवारी, ३० जून रोजी दुपारी अल्पशः आजाराने निधन झाले. त्यांच्यावर कोल्हापुरातील सी पी आर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना मेंदूत रक्तस्त्राव झाला होता. इचलकरंजीतील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कांबळे यांच्या त्या मातोश्री होत.