सरपंच यशपाल वाडकर यांचा गुणगौरव
सोलापूर : लोकतंत्र डिजीटल न्युज मराठी चॅनलच्या द्वितीय वर्धापन दिन तसेच छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या गुणीजन व्यक्तिंचा गौरव पुरस्कार सोहळा बुधवारी पार पडला. या गौरव सोहळ्याने कासेगांवच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. सरपंच यशपाल वाडकर यांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात, २६ जून रोजी सायंकाळी आयोजित गुणीजनांच्या गौरव सोहळ्यात, अरुणकुमार उडाणशिव (देशसेवा-सैनिक), बबलु गायकवाड (समाजसेवा), अॅड. रविंद्र दुलंगे (विधी सेवा), सौ. सविता गायकवाड (मुख्याध्यापिका), डॉ. औदुंबर मस्के (आरोग्य सेवा), यशपाल वाडकर (सरपंच), श्रीमती मीरा देसाई (उद्योजिका), विशाल सुर्वे (उद्योजकता ट्रेनिंग), श्रीकांत बुर्जे (पोलीस), अ. हमीद अ. रशीद हिरोली (आरोग्य निरीक्षक), श्रीमती देवगना इंगळे (सफाई कामगार), प्रा. डॉ. अंजना गायकवाड (निवेदिका), महेंद्र जाधव (कनिष्ठ अभियंता), आतिश शिरसट (मनोरुग्ण सेवा) आणि डॉ. लक्ष्मण राऊतराव (पशुसेवा) यांचा त्या- त्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला.
यावेळी डॉ. दिपाली काळे (पोलीस उपायुक्त, सोलापूर), अॅड. प्रदिपसिंह रजपूत (सरकारी तथा सी.बी.आय.वकील), दिपक खलाणे (वनपरिक्षेत्र अधिकारी), विक्रम खेलबुडे (श्रमिक पत्रकार संघ अध्यक्ष), दिपक आर्वे (माजी सहा. पोलीस आयुक्त), महादेव कोगनुरे (एम. के. फाऊंडेशन, संस्थापक -अध्यक्ष), प्रांजली मोहीकर (कवयित्री तथा राष्ट्ररत्न फाऊंडेशन अध्यक्षा) आणि प्रा.डॉ. रविंद्र चिंचोळकर (माजी विभाग प्रमुख मास कम्युनिकेशन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ) यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते, असं मुख्य संपादक संगप्पा कांबळे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजक राहुल उडाणशिव (उप संपादक), रमेश जाधव (उप संपादक), अमोल वाघमारे, सिध्दार्थ भडकुंबे, रजनीकांत इंगळे, उमर फारुक शेख, डॉ. सिध्दार्थ तळभंडारे, हरिष फडतरे आणि सुरज थोरात यांनी परिश्रम घेतले. या गुणीजन गौरव सोहळ्यात सरपंच यशपाल वाडकर यांना गौरविण्यात आले. हा गौरव गावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवलाय. सरपंच वाडकर यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.