सोलापूर : जिल्ह्यातील ४२ सोलापूर आणि ४३ माढा लोकसभा मतदार संघांचे ०७ मे रोजी मतदान पार पडले. या दोन्ही मतदार संघातील EVM VVPAT मशिन व इतर साहित्य शासकीय धान्य गोदाम, रामवाडी येथे ठेवण्यात आलेले आहेत. त्याठिकाणी सध्या त्रिस्तरीय सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
मंगळवारी, ०४ जून रोजी सकाळी ०८.०० वा पासून ४२ सोलापूर व ४३ माढा लोकसभा मतदार संघाची शासकीय धान्य गोदाम, रामवाडी येथे मतमोजणी प्रक्रिया सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने लावण्यात आलेला बंदोबस्स्तात ११६० पोलीस अधिकारी-कर्मचारी,सी आर पी एफ -१ प्लाटून, एस आर पी एफ-०१ कंपनी आणि सोलापूर ग्रामीणकडील ०१ अधिकारी २० अंमलदार यांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
सोलापूर शहरात एकूण ६६ ठिकाणी फिक्स पॉईंट लावण्यात आलेले आहेत. शहरात एकुण-६ ठिकाणी स्ट्रायकींग फोर्स लावण्यात आलेला आहे. पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर यांच्याकडून ०४ जून रोजी लावण्यात आलेल्या बंदोबस्ताचा गोषवारा खालीलप्रमाणे आहे.
पोलीस उप आयुक्त ०३
सहा पोलीस आयुक्त ०६
पोनि २४
सपोनि/पोसई ७३
पो. अमलदार ८९०
महिला अंमलदार १६४
बाहेरील बंदोबस्त खालीलप्रमाणे :
सी आर पी एफ
१ प्लाटून
एस आर पी एफ
०१ कंपनी
सोलापूर ग्रामीण
०१ अधिकारी २० अंमलदार