सोलापूर : शासकीय धान्य गोदामात (रामवाडी) मंगळवारी, ०४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणी परिसरात पत्रकार बांधवांसाठी जिल्हाधिकारी यांच्या महत्वाच्या सूचना केल्या आहेत.
1) मिडिया सेंटरपर्यंत पत्रकार व माध्यम कक्षातील अधिकारी कर्मचारी यांना मोबाईल सोबत नेण्यास परवानगी..
2)मतमोजणी कक्षात पत्रकारांना (प्रत्येक,भेटीला,5पत्रकार) मतमोजणी ची प्रक्रिया पाहण्यासाठी माध्यम कक्षातील कर्मचारी घेऊन जातील,परंतु मोबाईल घेऊन जाण्यास प्रतिबंध आहे. आपले मोबाईल मिडिया कक्षातच ठेवावेत. यावेळी मुव्ही व फोटो कॅमेरा घेऊन जाण्यास परवानगी असेल ..
3) पण मतमोजणी कक्षातील कामकाजाचे झूम चित्रीकरण करण्यास मनाई आहे.
4) मत मोजणी कक्षातील रेड लाईन ओलांडून कोणीही आत जाऊ नये.
5) पत्रकार ,प्रतिनिधी यांना कॅमेऱ्या सोबत ट्रायपॉड आत नेता येणार नाही.
6) रामवाडी शासकीय गोदामाच्या आतिल परिसर, आवारात कोणत्याही उमेदवार किंवा राजकीय एजंटचे बाईट घेण्यास मनाई आहे.
7) मतमोजणीचे फेरिनिहाय अपडेट त्वरीत मिडिया व्हॉट्सअप ग्रुप वर दिले जाईल, असंही सूचित करण्यात आलं आहे.