(प्रतिकात्मक छायाचित्र)
सोलापूर : बार्शी येथील मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहांमध्ये सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत, असंआवाहन वसतिगृहाचे गृहपाल के.ए. सारंगकर यांनी केलं आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुणवंत मुलांचे शासकिय वसतिगृह नवीन, गाडेगांव रोड, आयटीआय कॉलेज समोर म्हाडा कॉलनी, बार्शी, ता. बार्शी तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह जुने, गाडेगाव रोड, आयटीआय कॉलेजवळ,बार्शी या वसतिगृहाची सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाची वसतिगृह प्रवेश प्रकिया सुरु करण्यात आलेली आहे. प्रवेशासाठी विनामुल्य् अर्ज वाटप वसतिगृहावर ०५ जून २०२४ पासुन सुरु झालेले आहेत.
वसतिगृहात प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गणवेष, निर्वाह भत्ता, वसतिगृहामध्ये राहण्याची, नाष्टा व दोन वेळेच्या जेवणाची सोय मोफत करण्यात येते. तरी इच्छुक गरजु व पात्र विदयार्थ्यानी याचा लाभ घ्यावा. असे आवाहनही वसतिगृहाचे गृहपाल के.ए. सारंगकर यांनी केलं आहे.