॥ निधन वार्ता ॥ ज्येष्ठ पत्रकार अशोक सुरवसे यांना मातृशोक

shivrajya patra

 

सोलापूर : चपळगांव (तालुका : अक्कलकोट) येथील श्रीमती शकुंतला उर्फ रुक्मिणी ज्ञानदेव सुरवसे (वय - ७५ वर्षे) यांचे वृध्दापकाळी अल्पशः आजाराने शुक्रवारी, २१ जून रोजी पहाटे निधन झाले. त्या मृत्यूसमयी ७५ वर्षीय होत्या.

चपळगांव येथे दुपारी ०२ वा. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात प्रकाशराव, स्वामीनाथ अशी तीन मुले, सुना-नातवंडे असा परिवार आहे. त्या ज्येष्ठ पत्रकार अशोक सुरवसे यांच्या आई होत.

To Top