सोलापूर : जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचे जीवनचरित्र जनमानसात रुजविण्यासाठी आणि मंगळवेढ्यात स्मारक निर्मितीसाठी प्रभावीपणे कार्यरत राहून लिंगायत समाजात जागृती केल्याबद्दल डाॅ.बसवराज बगले यांना " समाजरत्न " पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सोलापुरातील ड्रीम फाऊंडेशन आणि यशोधन पतसंस्थेकडून बसवारूढ मठाचे मठाधिपती शिवपुत्र महास्वामीजी आणि तीर्थचे बसवराज स्वामीजी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
दहावी-बारावी परिक्षेत यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि १ जून हा जन्मदिवस असलेल्या शेकडो नागरिकांचा तसेच समाजातील उल्लेखनीय कार्य केलेल्या समाज सेवकांचा गौरव समारंभ ड्रीम फाऊंडेशनचे अध्यक्ष काशीनाथ भतगुणकी आणि यशोधन पतसंस्थेचे अध्यक्ष काशीनाथ पुजारी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
यावेळी बोलताना प्रा.लक्ष्मणराव ढोबळे, शिवपुत्र महास्वामी, बसवराज शास्त्री, काशीनाथ भतगुणकी आदिंनी डाॅ.बगले यांनी महात्मा बसवेश्वर महाराजांच्या आचार, विचार, आणि संस्कारातून समाजबांधवामध्ये व्यापक जागृती केली आहे. समाज प्रवाहात सदैव क्रियाशील राहणारे ते एक अष्टपैलू समाजरत्न आहेत, असे गौरवोद्गार काढले.
यावेळी माजी मंत्री तथा भाजपा नेते प्रा. लक्ष्मण ढोबळे, सोलापूर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त संदीप कारंजे, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त दिपक आर्वे, माजी उपमहापौर पद्माकर काळे, समाजसेवक शामराव धुरी, शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख संतोष पाटील, शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सारणे, बसवेश्वर प्रतिष्ठानचे श्रीशैल हत्तुरे, अरविंद भडोळे, संभाजी आरमारचे श्रीकांत डांगे, काँग्रेसचे विनोद भोसले, शिवानंद गोगाव, संगिता भतगुणकी, वैशाली शहापूरे, शोभा स्वामी, शरणप्पा फुलारी, दत्तात्रय पाटील यांच्यासह बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते.