सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव परिसरात झालेल्या पावसामुळे कासेगांव-उळेगांव रस्त्यावर नदीवर पूलावर आलेल्या पाण्यात मंगळवारी मध्यरात्रीनंतर एका दुचाकीवर पूल ओलांडत असलेले तिघे जण पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले असल्याचे माहिती मिळतेय.
कासेगांव ज्ञानेश्वर संभाजी कदम, बबन संदीपान जाधव आणि महादेव राजकुमार रेड्डी अशी त्यांची नावे आहेत त्यापैकी बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांना पुराच्या पाण्याबरोबर वाहून जात असताना ओढा प्रवाहातील झाडांना पकडून स्वतःला वाचविण्यात यश आले तर ज्ञानेश्वर कदम सकाळपर्यंत मिळून आला नसल्याचा ग्रामस्थांमध्ये बोललं जातंय.
कासेगांवच्या नदीवर गतवर्षी जूना पूल काढून नव्यानं पूल बांधण्यात आलाय. नव्यानं बांधण्यात आलेला अदूरदर्शीपणानं बांधण्यात आलाय. जून्या पूलाच्या उंचीपेक्षा जवळपास ५ फूटापेक्षा अधिक खोली करून बांधण्यात आल्यानं ग्रामस्थांनी त्यास प्रारंभापासून त्यास विरोध दर्शवलाय. तो चुकीच्या पध्दतीने बांधण्यात आल्याचा ग्रामस्थांचा आक्षेप आहे, त्यातच ही दुर्घटना घडलीय.