Type Here to Get Search Results !

हर्षवर्धन हायस्कूल (हिप्परगे तळे) ची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम; कु. राजकन्या गायकवाड प्रथमस्थानी

                         ( प्रतिकात्मक छायाचित्र)

कासेगांव/संजय पवार : उत्तर सोलापूर तालुक्यातील हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगे तळे इयत्ता *दहावी निकाल 90.62. लागला असून या प्रशालेतील निकालात मुलींनी बाजी मारली. कु. राजकन्या किशोरी गायकवाड हिने 85 टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवला. कु. प्रज्ञा नितीन वडवेराव 84.20 टक्के मार्क मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला तर तृतीय क्रमांक कुमारी विद्याराणी ज्योतिबा सुरवसे हिने 83.60 टक्के व कुमारी स्नेहा सौदागर गायकवाड हिने 83.60 टक्के गुण प्राप्त केले असून या विद्यार्थ्यांना विभागून  तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. 

प्रशालेत विशेष श्रेणीमध्ये 13 विद्यार्थी तसेच प्रथम श्रेणीमध्ये 45 विद्यार्थ्यांनी  यश प्राप्त केले आहे. या यशाबद्दल संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व प्राचार्य लक्ष्मण राऊत यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले.

...............



कासेगाव येथील भोसले प्रशालेचा 

दहावीच्या परीक्षेत 98.40/. निकाल 

कासेगाव/संजय पवार : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण प्रसारक मंडळ, कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर,जिल्हा सोलापूर संचलित बॅरिस्टर बाबासाहेब भोसले प्रशाला कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथील SSC परीक्षा मार्च2024* चा *98.40 % निकाल*लागला असून प्रशालेत सर्व प्रथम क्रमांक मुलीनी पटकाविला आहे. यामध्ये कु.लोकरे राजश्री सिद्धू-85.00%* प्रथम, कु.चौगुले गार्गी भिमराव  83.40%* द्वितीय आणि कु.काटकर श्रेया अर्जुन  83.40%*    तृतीय क्रमांक पटकावला.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव चौगुले  यांनी तसेच संस्थेचे सचिव सच्चिदानंद चौगुले, प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय बोधीप्रकाश गायकवाड यांनी व विद्यालयाचे   व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करून पुढील शैक्षणिक कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या