०३ गुन्हे उघड; २७,६८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
सोलापूर : विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीतील दाखल घरफोडीच्या गुन्ह्यात घटनास्थळावरील प्राप्त सी.सी.टी. व्ही. फुटेज विश्लेषण करून तांत्रिक माहितीच्या आधारे एका सराईत गुन्हेगारास अवघ्या ०६ तासात गजाआड करण्यात यश आलंय. सॅमसन रूबीन डॅनियल (वय-२५ वर्षे) असं गुन्हेगाराचं नांव आहे. त्याच्या ताब्यातून २७, ६८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना दिली.
रविवारी दुपारी कोणार्क नगरातील पद्मावती रेसिडेन्सीमधील रहिवासी दीपक गजानन मठपती यांच्या घरात अज्ञात चोरट्यानं बेडरूममधील लोखंडी कपाटातील कप्प्यात ठेवलेली १२, ५०० रुपयांची रोकड तर दुसऱ्या घटना लोखंडवाला आइसलँड कॉम्प्लेक्समधील आशिष बाबासाहेब निंबाळकर यांच्या बंद घराचा कोयंडा उचकटून लाकडी कपाटात ठेवलेल्या पर्समधील १८, ४०० रुपयांची रोकड चोरून नेली. या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्याकडे अनुक्रमे गुन्हा रजिस्टर नंबर २३४ आणि २३५ /२०२४ भादंवि कलम ३८०,४५४ गुन्हे नोंद होते.
या घरफोडीच्या गुन्ह्यात घटनास्थळावरील प्राप्त सी.सी.टी. व्ही. फुटेज विश्लेषण करून तांत्रिक माहितीच्या आधारे येथील रेल्वे स्टेशनमध्ये सापळा रचून कल्याण-ठाणे येथील सराईत आरोपीस पकडण्यात आले. सॅमसन रूबीन डॅनियल (रा. बेतुरकरपाडा, क्लॉलिटी कंपनी, डॅनियल हाऊस, रूम नं. ५, कल्याण पश्चिम, जिल्हा ठाणे) असं त्याचं नांव असून त्यास ०६ तासाच्या आत अटक करण्यात आलीय.
विजापूर नाका पोलीस ठाण्याकडील घरफोडीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने कसून चौकशी करीत असताना, भा.दं. वि. कलम ३८०,४५७ अन्वये जोडभावी पेठ पो.स्टे. (गु.र.नं. २८१/२४) या गुन्ह्याची त्याने कबुली दिली. ०३ गुन्हे उघडकीस आलेल्या ३ गुन्ह्यात २७,६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त (परीमंडळ) विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त (विभाग - २) अजय परमार , वरिष्ठ पोलीस निरिक्षक दादा गायकवाड, पोनि श्रीमती संगिता पाटील (गुन्हे) व गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सपोनि शितलकुमार गायकवाड, पोहेकॉ सचिन हार, पोना गणेश शिर्के, हुसेन शेख, पोकॉ संतोष माने, श्रीनिवास बोल्ली, अमृत सुरवसे, समाधान मारकड, सद्दाम आबादीराजे, राहुल सुरवसे, स्वप्निल जाधव, रमेश कोर्सेगाव, पोकॉ हरिकृष्ण चोरमुले यांनी पार पाडली.