Type Here to Get Search Results !

घरफोड्या करणाऱ्या दोघांच्या आवळल्या मुसक्या; ०८ गुन्हे उघडकीस


एमआयडीसी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश

सोलापूर :  शहरात होणाऱ्या घरफोड्याची माहिती काढून तसेच आरोपीतांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासंबंधी पोलीस आयुक्त एम राजकुमार व पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे यांनी सुचना दिल्या होत्या. एमआयडीसी पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार एका विधी संघर्ष बालकाशिवाय दोघांना अटक करण्यात आलीय.  ०८ गुन्ह्याचा उकल करण्यात पोलिसांना यश आलंय. त्यांच्या ताब्यातून ०३, ५९,०५० रुपये किंमतीचे सोने व रोख रक्कम जप्त हस्तगत करण्यात आलीय.

पोलीस आयुक्तालय हद्दीत सक्त पेट्रोलींग करुन, हस्ते-परहस्ते, बातमीदारांचे मदतीने कसोशीने घरफोड्या करणाऱ्या आरोपीतांचा शोध घेऊन नंदकुमार विजय कोक्कुल (वय-३१ वर्षे, रा. नवीन विडी घरकुल, ०१ नं. पाणी टाकी, कुंभारी), शाहु सिध्दप्पा काळे (वय-३६ वर्षे, रा. पारधी वस्ती, मु.पो. शरणा सिरसंगी, सध्या आवटी यांचे विटभट्टीत, एसव्हीसीएस शाळेच्या मागे, अक्कलकोट रोड, सोलापूर) आणि विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलीस ठाणे, सोलापूर शहरकडील ०८ गुन्हे उघडकीस आणले.

त्यात ०३, ५९, ०५० रुपये किंमतीचे सोने व रोख रक्कम जप्त हस्तगत करण्यात आली. या ०८ गुन्ह्याचा उकल होण्याच्या अनुषंगाने पोकॉ/१४८३ वाघे, पोहेकॉ/७४५ डोके, पोकॉ/१६१८अर्जुन, पोकॉ/१५८७ याळगी आणि पोकॉ/१४८३ वाघे यांनी गोपनिय माहिती मिळवली होती.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त अशोक तोरडमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, पो. नि. विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके, पोहेकॉ राकेश पाटील, नाना उबाळे, दिपक डोके, सचिन भांगे, पो. ना. मंगेश गायकवाड, पो.कॉ./ सुहास अर्जुन, शंकर याळगी, काशीनाथ वाघे, शैलेश स्वामी, दिपक नारायणकर, अमोल यादव, आमसिध्द निंबाळ, देविदास कदम, अमर शिवसिंगवाले, भारत तुक्कुवाले यांनी पार पाडली.