सोलापूर : जुना विडी घरकुल परिसरातील एच-२ ग्रुप (पोगुल विहीरच्या पाठीमागे) येथील रहिवासी लक्ष्मण सिद्राम गाजूल यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी, ३० मे रोजी निधन झाले. मृत्युसमयी ते ८५ वर्षांचे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते पत्रकार श्रीनिवास गाजूल यांचे सख्खे चुलते होत.