सोलापूर : रेल्वे प्रवाशांना पर्यावरणाचे संवर्धन आणि पर्यावरणविषयक जागरुकता निर्माण व्हावी, यासाठी सोलापूर रेल्वे विभागाने अनोखी शक्कल लढवली आहे. शुक्रवारी, ३१ मे रोजी 'नुक्कड' नाटकाचे आयोजन रेल्वे स्थानकावर करण्यात आले होते. ०५ जुन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हे नाटक सोलापुर रेल्वे स्थानकांवर आयोजीत करण्यात आले होते. यातील कलाकारांनी प्रवाशांना व उपस्थितांना पर्यावरणाचा -हास होण्यापासून वाचवण्याचे संदेश देण्यात आले.
प्लेटफॉर्म नंबर एक येथे उभी असलेली विशाखापट्टणम एक्सप्रेसमधील प्रवाशांनी या नुक्कड पथनाट्याच्या प्रयोगाचा आनंद घेतला. दिलीप तायडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, भविष्यात पर्यावरण विषयी जागरूकता किती महत्त्वाचे आहे, हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला.
याप्रसंगी नाटेकर, तायडे, लाडे, सहायक मंडल यांत्रिक इंजिनिअर सोलापूर विभाग, कृष्णा सुरवसे, उत्तम आदमाने सि.से.ईंजी/समाडी, सोलापूर, मुकुंद श्रेष्ठ आणि सांस्कृतिक कला मंच रेल्वे विभाग सोलापूर यांची प्रमुख उपस्थित होती.
यावेळी सर्व प्रवाशांनी हे नाटक मन लावून पाहिले, आणि पर्यावरणाच्या संबंधीत अनेक गोष्टी समजून घेतल्या. यावेळी पर्यावरण प्रभारी जितेंद्र वाघमारे यांनी या सर्वांचे आभार मानले.