Type Here to Get Search Results !

'लिटल स्टार' चे चमकले तारे... ! लिटल स्टार इंग्लिश मिडीयम स्कूलचा पहिल्याच वर्षी १०० टक्के निकाल


सोलापूर : शिक्षण प्रसारक मंडळ कुमठे संचलित, लिटल स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल, कुमठेलचा एस.एस.सी. (दहावी) बोर्ड परिक्षेचा निकाल  १०० टक्के लागला. पहिल्या वर्षात राठोड नम्रता विजय हिने ८७.०० टक्के गुण प्राप्त करत स्कूलमध्ये येण्याचा बहुमान पटकाविला. ८६.६० गुण मिळवत शेख सब्बा एजाज दुसऱ्यास्थानी तर जोशी तन्मय भगवंत हा विद्यार्थी ८६.४० गुण मिळवून तिसऱ्या क्रमांकावर राहिला. सर्व विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. 'लिटल स्टार' चे चमकले तारे अशा कौतुकाने या निकालाकडं पाहिलं जात आहे. 

विद्यार्थ्यांनी प्रचंड अभ्यास करुन शिक्षक-पालक यांच्यातील सुसंवादामुळेच हे यश संपादन करू शकले, असे मत मुख्य विश्वस्त जयकुमार माने यांनी त्यांचं अभिनंदन करताना व शुभेच्छा दिल्या. पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे  संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप माने  मुख्य विश्वस्त माजी नगरसेवक जयकुमार माने, विश्वस्त स्वाति माने, प्रिन्सिपल शुभांगी पवार यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. मार्गदर्शक शिक्षक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.