Type Here to Get Search Results !

१०० टक्के अनुदान... ! अन्नधान्य पिके अंतर्गत अनुदानावर बियाणे मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन


सोलापूर : राज्य शासनाच्या महा डीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या शिर्षकाखाली बियाणे घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या सुविधेतंर्गत लाभार्थ्यांना सन २०२४ मधील खरीप हंगामात अन्न व पोषण सुरक्षा अभियान कडधान्य अंतर्गत तुर, मुग व उडीद १० वर्षाच्या आतील बियाणेकरीता पन्नास रुपये प्रति किलो बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार आहे, तुर,मुग व उडीद १० वर्षाच्या वरील बियाणेकरीता २५ रुपये प्रति किलो बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार आहे.

 तसेच तुर, मुग व उडीद सलग पिक प्रात्यक्षिके, अंतरपीक पध्दती व पिक पध्दतीवर आधारीत पिक प्रात्यक्षिकासाठी ४० आर (०१ एकर) क्षेत्रासाठी १०० टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ०४ जून २०२४ पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केलं आहे.

अन्न व पोषण सुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्य अंतर्गत बाजरी १० वर्षाच्या आतील बियाणेकरीता रू. ३० किलो बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार आहे. तसेच बाजरी सलग पिक प्रात्यक्षीकासाठी ४० आर (०१ एकर) क्षेत्रासाठी १०० टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अन्न व पोषण सुरक्षा अभियान भरडधान्य अंतर्गत महा सलग पिक प्रात्यक्षीकासाठी ४० आर (१ एकर) क्षेत्रासाठी १०० टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

तरी शेतकऱ्यांनी महा डीबीटी पोर्टलवर ०४ जून २०२४ पर्यंत अर्ज करणे बंधनकारक आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महा डीबीटी पोर्टलवर अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केलं आहे.