सोलापूर : स्थानिक वृत्तपत्रात आलेल्या नोकरीविषयक जाहिरातीत एनटीपीसी रिक्रुटमेंट ची जाहिरात वाचून दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून बोलणी झाल्यावर प्रियंका चव्हाण व तिच्या पतीने कांताराम सिद्राम पाटील यांची १४ लाख ८६ हजार रुपयांची रक्कम घेऊन मुलास नोकरी लावण्याऐवजी आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर कांताराम पाटील यांनी बिजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. याप्रकरणी प्रियंका व तिचा पती सुरज रमेश चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.
जुळे सोलापुरातील मजरेवाडी परिसर जय मल्हार नगरातील रहिवासी कांताराम चव्हाण यांचा मुलगा बीई मेकॅनिकल झाल्याने ते स्थानिक वृत्तपत्राच्या नोकरी विषयक जाहिरातीत, त्यांनी N.T.P.C Recruitment, BE Mecanical, diseal mechanical, Electrical, Diploma Digri, ITI Electrical, fild engineer communication. Con- ९५२९७३४३५१ अशी जाहिरात होती.
ही जाहिरात पाहून कांताराम पाटील यांनी मुलगा प्रविण याचे बी ई मेकॅनीकल झाल्याने तो नोकरीस पात्र आहे. म्हणून पाटील यांनी दिलेल्या मोबाईल मोबाईल क्रमांकावर धारकास संपर्क केला असता, मोबाईल धारकाने तिचं नाव प्रियंका चव्हाण असे सांगितले व त्यानंतर तिचे पती सुरज चव्हाण याच्याकडे फोन दिला. त्यावेळी सुरज चव्हाण याने पाटील यांना त्यांच्या राहते घरी विजापूर रस्त्यावरील कित्तुर चन्नम्मा नगरात मिटींगसाठी बोलावले.
३१ डिसेंबर २०२२ पासून सुरू झालेल्या या फसवणूक नाट्यात प्रियंका चव्हाण व तिचा पती सुरज चव्हाण यांनी कांताराम पाटील व त्यांच्या मुलास घरी बोलाविले. त्यानी तुमच्या मुलास नोकरी लावतो, त्या बदल्यात १५ लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. त्यास प्रशिक्षण काळात ३० ते ८० हजार रुपये इतका पगार मिळेल, अशी थाप मारली. त्यावर विश्वास ठेऊन पाटील यांनी चव्हाण यांच्या खात्यावर वेळोवेळी करुन ९ लाख रुपये पाठविले.
थोड्या दिवसांनी नोकरीबाबत विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, मंत्रालय मुंबई येथील सचिव यांचेशी बोलणे झाले आहे. त्यानंतर बाकीचे राहिलेले पैसे पाठवा, असे सांगितल्याने फिर्यादी यांनी उर्वरित रक्कम प्रियंका चव्हाण हिच्या फोन पे वर वेगवेगळ्या तारखेस पैसे पाठविले. पाटील यांनी मुलाला नोकरी लागण्यासाठी १४,८६,००० रुपये चव्हाण दाम्पत्याकडे दिले.
त्यानंतर कांताराम पाटील यांनी वेळोवेळी नोकरीसंदर्भात प्रियंका सुरज चव्हाण आणि सुरज रमेश चव्हाण यांच्याकडे विचारणा केली असता, दोघेही उडवा-उडवीची उत्तरे देऊ होते. त्यानंतर त्यांच्याशी वेळोवेळी संपर्क केला असता, ते केलेल्या कॉलला प्रतिसाद देण्यास टाळत राहिले, तसेच त्यांना दिलेली रक्कम परत देत नाहीत, यावरुन कांताराम पाटील यांची फसवणूक झाल्याची खात्री पटली.
पाटील यांनी चव्हाण दांम्पत्याकडं वेळोवेळी ऑनलाईन व रोख स्वरुपात १४,८६,००० रु घेऊन ते रुपये परत मागितले असता, आज देतो, उद्या देतो अशी टाळाटाळ सुरू केली. ती रक्कम आजतागायत पर्यंत न मिळाल्याने कांताराम पाटील यांनी आर्थिक फसवणूक झाल्याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी प्रियंका सुरज चव्हाण आणि सुरज रमेश चव्हाण यांच्याविरुद्ध भादवि ४२०,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. मपोनि पाटील या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.