सोलापूर : येथील शिक्षक हाऊसिंग सोसायटी, वेळूवन बुध्द विहारात कपिल तरुण मंडळ यांच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती गुरुवारी, २३ मे रोजी सकाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. वेळूवन बुद्धविहार येथे १० दिवसीय श्रामनेर शिबीर सुरु असून भन्ते बी. सारीपुत्त यांच्या मार्गदर्शनामध्ये हे शिबीर होत आहे.
आयु. सुनिता दिलपाक यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यकमाची सुरवात करण्यात आली.