Type Here to Get Search Results !

माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीमधील अधिकारी व कर्मचारी यांनी घेतली मतदानाची प्रतिज्ञा


सोलापूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयामधील जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीमधील अधिकारी व कर्मचारी यांना समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के यांनी ७ मे २०२४ रोजी सोलापूर व माढा मतदार संघासाठी होणाऱ्या निवडणूकीत मतदान करण्याची प्रतिज्ञा दिली.

यावेळी आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपराचे जतन करू आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू, अशी प्रतिज्ञा घेण्यात आली.


तसेच लोकसभा निवडणूकीमध्ये सर्वांनी मतदान करुन लोकशाहीच्या उत्सवामध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, याबाबत जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी समिती सदस्य तथा क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकूश चव्हाण यांच्यासह माध्यम व प्रमाणीकरण समितीमधील अंबादास यादव, रफिक शेख,  गणेश बिराजदार, डॉ.श्रीराम राऊत, सचिन सोनवणे, समीर मुलाणी, धुळाप्पा जोकार, सुभाष भोपळे, शरद नलावडे, मिलिंद भिंगारे, ईलीहास ईनामदार, संजय घोडके, दिलीप कोकाटे, राजेंद्र तारवाले, आर.एच.शेख, एल.आर. बोमेन, बसवराज माळी, भास्कर मदनाला, भाऊसाहेब चोरमले , ईकबाल भाईजान, नागेश दंतकाळे, प्रविण चव्हाण, एम.एस.साठे, एस.एन.शेंडगे, अमोल घाडगे, प्रिया शहाबादे, पुजा बाबर, अमोल कोळी आदी उपस्थित होते.