सोलापूर/सुहेल शेख :
भारत हा ऋषी प्रधान देश आहे. देशातील सर्वात नि:स्वार्थी प्रयत्न करणारा समूह म्हणून शेतकऱ्यांची ओळख आहे. तो पिकवित असलेलंधान्य, फळं, भाज्या कोणाच्या मुखात जाणार आहे, याची कल्पना नसताना ही तो नि:स्वार्थ तळमळीने कष्ट करून पिकवतो. शेतकरी जगला, तरच देश जगणार आहे. कष्टकरी-श्रमकरी शेतकऱ्यांचा सन्मान हा देशाचा सन्मान आहे, असे मत शिवश्री नेताजी गोरे यांनी व्यक्त केले.
मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी ईद मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात प्रयोगशील उदयोन्मुख उच्च शिक्षित शेतकरी प्रताप ढेंगळे, चांगदेव काशिद, सुधीर कोकाटे, पंकज पिसाळ, वसंतराव वडगांवे आणि शकील बागवान यांचा सन्मान मराठा सेवा संघाचे माजी प्रदेशाध्यक्ष नेताजी गोरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या सन्मान प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिवश्री नेताजी गोरे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रयोगशील शेतकरी बालाजी पंडित भोसले होते.
या कार्यक्रमास मौलाना ताहेर बेग, भंते सारीपुत्र, राजशेखर हिरेहब्बू, माजी आमदार दिलीप माने, नरसय्या आडम, नरसिंग मेंगजी, चंद्रकांत वानकर, माजी महापौर आरिफ शेख, ॲड यु. एन. बेरिया, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. अजय दासरी, अमोल बापू शिंदे, विष्णू कारमपुरी, सुधीर खरटमल, पद्माकर काळे, राजन जाधव, संतोष पवार, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, रियाज हुंडेकरी, श्रीदेवी फुलारी, केदार उंबरजे, काॅ. रविंद्र मोकाशी, गंगाधर कारीमुंगी, हाजी के. बी. नदाफ, हाजी मुनाफ चौधरी, प्राचार्य महेबुब दलाल, अन्वर सैफन, हाजी मैनोद्दीन शेख, विष्णू गायकवाड, युवराज पवार, श्रीकांत घाडगे, माऊली पवार, आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचं प्रास्ताविक संयोजक हाजी मतीन बागवान यांनी केले तर सुत्रसंचलन राम गायकवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष शफीक रचभरे, राजू हुंडेकरी, जावेद बद्दी, बशीर सय्यद, अमजद पठाण, हारुन शेख, तन्वीर गुलजार, कादर भागानगरी, वाहिद तांबोळी, वाहिद शेख, तन्वीर शेख, अ. गनी करनूल, मोहसीन नदाफ, कय्युम मोहोळकर, गफारखान पठाण आणि रुस्तुम शेख यांनी परिश्रम घेतले.