सोलापूर : होमकर नगर येथील रहिवासी, बांधकाम व्यावसायिक व उत्कर्ष क्रीडा मंडळाचे राज्यस्तरीय खो-खो खेळाडू प्रमोद प्रभाकर शिवपुजे यांचं शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते मृत्यूसमयी ५२ वर्षीय होते. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर रूपाभवानी येथील लिंगायत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात आई, २ बहिणी, पत्नी व २ मुली असा परिवार आहे.