सोलापूर : उपचाराकरीता झालेल्या खर्चाचे बिल मिळणेकरीता तीन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद सोलापूर यांचेकडे अर्ज केला होता. ती तिन्ही बिल मंजूर होऊन पंचायत समिती बार्शी येथील अर्थ विभागाकडे बिल अदा करण्यासासाठी निधी प्राप्त झाला होता. ती रक्कम देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी कंत्राटी कर्मचाऱ्यासह तिघाविरुद्ध बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार महिलेच्या पतीस २०२१ मध्ये कोविड संसर्ग झाला होता. दरम्यान आई पाय घसरून पडल्याने डोक्यास मार लागून जखमी झाली होती. त्यांच्या उपचाराचा खर्च तक्रारदाराने केला होता. ती तिन्ही वैद्यकीय बिले जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात आली होती त्यास मंजुरी मिळाल्यावर ते अदा करण्यासाठी बार्शी पंचायत समितीच्या अर्थ विभागाकडे पाठवून देण्यात आली होती.
त्यावेळी वैराग प्राथमिक आरोग्य केंद्रातील कनिष्ठ लिपिक लोकसेवक अविनाश अंकुश यांनी तक्रारदाराकडं बिल अदा करण्यासाठी बाबासाहेब माने यांचे नावे २ हजार रुपये लाचेची मागणी केली, त्यानंतर बाबासाहेब माने यांची पडताळणी केली असता, त्यांनीही बिल अदा करणेसाठी २ हजार रुपये लाचेची मागणी केली.
प्रत्यक्ष सापळा कारवाई दरम्यान बाबासाहेब माने यांचे सांगण्यावरून कंत्राटी कर्मचारी निखील मांजरे यांच्यामार्फत लाच रक्कम स्विकारली. यावरुन आरोपी बाबासाहेब सुभाष माने (वय - ४० वर्षे, पद- सहायक लेखाधिकारी, नेम- पंचायत समिती बार्शी, वर्ग -३ रा. शिवाजी नगर, वैराग, ता. बार्शी जि. सोलापूर) इलोसे निखिल दत्तात्रय मांजरे (वय - ३२, पद- डाटा एंट्री ऑपरेटर(कंत्राटी) पंचायत समिती बार्शी, रा. मु.पो. देवगांव ता. बार्शी) यांना ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया बार्शी शहर पोलीस ठाण्यात तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
अविनाश देसाई अंकूश (वय - ५० वर्षे, पद- कनिष्ठ लिपीक नेम- प्राथमिक आरोग्य केंद्र, वैराग ता. बार्शी जि. सोलापूर वर्ग-३ रा. स्वरुपानंद नगर, वैराग, ता. बार्शी) असं तिसऱ्या आरोपीचं नांव असल्याचं सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांनी सांगितलंय.
ही कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस अधीक्षक अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथकातील पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी (ला.प्र.वि, सोलापूर), पोलीस अंमलदार- पोना/संतोष नरोटे, पोशि/ गजानन किणगी, चालक पोह/ राहुल गायकवाड (सर्व नेमणुक - अॅन्टी करप्शन ब्युरो, सोलापूर)
... आवाहन ...
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपणास कोणी शासकीय अधिकारी/कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा.
गणेश कुंभार
पोलीस उप अधीक्षक
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर.
मोबाईल क्र. 9764153999
कार्यालय क्र. 0217-2312668
ईमेल dyspacbsolapur@gmail.com