Type Here to Get Search Results !

'बी फार्मसी' ला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने ०१.८० लाख रुपयांची फसवणूक


सोलापूर : परराज्यात बी फॉर्मसी ला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने सागर राजशेखर हिरेहब्बू यांची ०१ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आलीय. ही घटना ऑक्टोबर २०२१ ते जून २०२२ दरम्यान घडलीय. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात ठकसेन तुषार सिद्राम हिप्परगे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, येथील उत्तर कसबा भागातील रहिवासी सागर राजशेखर हिरेहब्बू यांच्याकडून बी फार्मसी कॉलेज बिदर येथे ऍडमिशन मिळवून देण्याच्या बहाण्याने ऑक्टोबर २०२१ ते जून २o२२ यादरम्यान वेळोवेळी एसबीआय बाळीबेस शाखेच्या खाते क्रमांक आवरून फोन पे व गुगल पे च्या माध्यमातून रक्कम ऑनलाइन पाठवली गेली.

तसेच सागर हिरेहब्बू यांचे मित्र मल्लिकार्जुन येनपे आणि अप्पु नावडे या दोघांनी प्रत्येकी ६० हजार रूपये तुषार सिद्राम हिप्परगे याच्या खात्यामध्ये ऑनलाईन जमा केले. दरम्यान सागरचा मेव्हणा संकेत बाभूळगावकर यास गॅप सर्टिफिकेट काढून सोलापूर विद्यापीठ येथे अॅडमिशन करून देतो, म्हणून १० हजार रूपये ऑनलाईन घेतले. अशाप्रकारे १ लाख ८० हजार रूपयाची फसवणूक केल्याप्रकरणी तुषार हिप्परगे यांच्याविरुद्ध भादवि ४२० प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मपोसई जेऊघाले या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.