शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष समन्वय समितीची सोमवारी तातडीची बैठक

shivrajya patra

सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष समन्वय समितीची  तातडीचे बैठक सोमवारी, ०८ एप्रिल  रोजी सकाळी १०.३० वा. शिवसेना उपनेते शरद कोळी यांचे संपर्क कार्यालय, शिवसेना भवन सोलापूर येथे आयोजित करण्यात आल्याचे माहिती सोलापूर सहसंपर्कप्रमुख व लोकसभा निवडणूक समिती प्रमुख उत्तम प्रकाश खंदारे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिलीय.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार व संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनेते शरद कोळी यांच्या अध्यक्षतेखाली. उपनेते अस्मिता गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आलीय.

या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीचे रणनीती बाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहे. समन्वय समितीच्या सर्व निमंत्रित सदस्यांनी या बैठकीस उपस्थित राहावे, असं आवाहन उत्तम प्रकाश खंदारे यांनी केलंय.


To Top