Type Here to Get Search Results !

निवडणूक काळात जप्त केलेल्या रकमेसंदर्भात जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत



सोलापूर : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर सोलापूर ४२, माढा ४३ या लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता तात्काळ प्रभावाने अमलात आली आहे या पार्श्वभूमीवर निवडणूक काळात जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेबाबत निर्णय घेण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हास्तरीय समिती गठीत केली आहे.

या समितीमध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, खर्च सनियंत्रण नोडल अधिकारी आणि जिल्हा कोषागार अधिकारी यांचा समावेश असून, समिती कार्यालय जिल्हा ग्रामीण  विकास यंत्रणा, कोषागार कार्यालय समोर, सोलापूर येथे  स्थापन करण्यात आले असल्याचे नोडल अधिकारी खर्च संनियंत्रण तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे-ठोके  (संपर्क क्रमांक -7387033278)  यांनी कळविले आहे.