सांगली : येणाऱ्या काळात सांगलीमध्ये जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांचं मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षासाठी प्रामाणिकपणे, ताकदीने काम करु, अशी ग्वाही शितल खाडे यांनी दिली.
बुधवारी, ०३ मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या हस्ते शितल मिराबाई विठ्ठल खाडे यांना 'सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष पदी' नियुक्तीचे पत्र देऊन पुष्पगुच्छ देत पक्षात स्वागत करत शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी खाडे बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल तथा राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे, राष्ट्रवादी काँग्रेस रिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस सांगली शहर जिल्ह्याचे खजिनदार निलेश शाह, अझरुद्दीन जमादार, रोहित आठवले, विश्व लिंगायत महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इंजि. एन. पी. कोरे, अनिल कोरे, नवनाथ भालेकर, उमेश मोरे, सुर्यकांत खाडे, विशाल खाडे, विजय कांबळे, संतोष कांबळे, श्रावण साबळे, समाधान साबळे, सम्यक खाडे, संतोष हेगडे, गणेश जगताप, आकाश जाधव, आशिष विभुते, रोहित कांबळे, विशाल शिंदे, प्रियेष नायकवडी, गोपाल आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 'सांगली शहर जिल्हाध्यक्ष' संजयजी बजाज यांच्या हस्ते शितल मिराबाई विठ्ठल खाडे यांची 'सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष पदी' नियुक्तीचे पत्र देत पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.